महिलेवर झाड कोसळलं, त्यात मनपाचा दोष नाही: बीएमसीचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 01:13 PM (IST)
नारळाचे पडलेले झाड केवळ जोरदार हवेमुळे पडले, यात महापालिकेचा कोणताही दोष नाही असं या अहवालात म्हटलं आहे.
मुंबई: चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं अहवाल सादर केला आहे. नारळाचे पडलेले झाड केवळ जोरदार हवेमुळे पडले, यात महापालिकेचा कोणताही दोष नाही असं या अहवालात म्हटलं आहे. यापूर्वी पालिकेच्या एम पश्चिम विभागानं सादर केलेल्या अहवालातही हेच सांगण्यात आले होते. यावरुन महापालिकेने हात वर केल्याचं स्पष्ट होत आहे. 20 जुलैला चेंबूरमधील स्वस्तीक पार्क परिसरात कांचन नाथ या मार्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळ त्यांच्या अंगावर नारळाचं झाड पडलं. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. महत्वाचं म्हणजे हे झाड धोकादायक असल्यानं नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. पण आता महापालिकेनं या घटनेतून स्वतःला बाजूला करत, हा नैसर्गिक अपघात दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार या झाडाला कीड लागलेली होती. त्यामुळे झाड कोसळण्याची शक्यता असल्यानं लोकांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागात तक्रारीही दिल्या होत्या. संबंधित बातमी VIDEO: