मुख्यमंत्र्यांमध्ये खडसेंवर कारवाई करण्याची हिंमत नाही : दमानिया
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2017 08:36 PM (IST)
खडसेंकडे सगळ्यांची अंडी-पिल्ली असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
मुंबई : एकनाथ खडसे यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असा थेट घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंविरोधात अश्लील टिप्पणीची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने दमानियांनी हा आरोप केला. खडसे म्हणाले होते 'मी बोललो तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल'. खडसेंकडे सगळ्यांची अंडी-पिल्ली असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असं दमानिया म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात, मुंबईत एकही महिला सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल, असंही त्या म्हणाल्या.