Dharavi Redevelop Project: आशियातल्या सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग जवळपास मोकळा झालाय... विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या आणि मागील 18 वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकासाचा काम अदानी समूहाकडे गेला आहे...तब्बल 5069 कोटी रुपयांची अदानींची बोली या प्रक्रियेत सरस ठरलीये... त्यामुळे आता राज्य सरकारच्या मान्यतेची या सगळ्याला प्रतीक्षा आहे... आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करणारा, धारावीकरांचे पुनर्विकास स्वप्न पूर्ण करणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प कसा असणार ? निविदा प्रक्रिया नेमकी कशी पार पडली ? आणि याचा धारावीकरांना आणि आदनींना कसा फायदा होणार ? पाहुयात त्यासंदर्भातील माहिती..  


18 वर्ष रखडलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळालेली पाहायला मिळतीये...2004 ला पहिल्यांदा धारावी पुनर्विकास प्रकल्प समोर आला. पुनर्विकासासाठी 2009, 2016आणि 2018 मध्ये म्हणजे आतापर्यंत एकूण तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कधी निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे निविदा रद्द करण्यात आली. आता मात्र अदनींने 5069 कोटींची बोली लावून या महत्वकांक्षी विकास प्रकल्पामध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेत बाजी मारली आहे. 
 
बोली प्रक्रिया कशी पार पडली ?


मागील 18 वर्षात वेळेस धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली


या पुनर्विकास प्रकल्पासाठी एकूण आठ कंपन्यांनी आपला प्रतिसाद दर्शवला


यामधील डीएलएफ, अदानी, नमन या तीन कंपन्या बोली लावण्यास पात्र ठरल्या


या प्रकल्पाची एकूण आधारभूत किंमत 3750 कोटी होती, यामध्ये नमन कंपनीची बोली अपात्र ठेवण्यात आली डी एल एफ कंपनीने 2025 कोटीची बोली लावली तर आदानी ने 5069 कोटींची बोली लावली... आणि अदानी कंपनीने बाजी मारली


त्यामुळे आता राज्य सरकारच्या परवानगी नंतर या निविद्या प्रक्रियेला अंतिम रूप येणार आहे


आता अठरा वर्षापासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प नेमका कसा असणार आणि त्यामुळे धारावीकरांना आणि आदानी कंपनीला कसा फायदा होणार हे सुद्धा समजून घेऊया


धारावी पुनर्विकास प्रकल्प कसा असणार ? 


साधारणपणे 700 एकर धारावीच्या परिसरात पुनर्विकास प्रकल्प केला जाणार आहे


या प्रकल्पामध्ये 78 हजार धारावीत राहणाऱ्या कुटुंबाला म्हणजे जवळपास दहा लाख लोकांना या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होणार आहे


सोबतच धारावीतील 12,000 लघु मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्यांना सुद्धा या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होईल


धारावीतील 2,3,4 सेक्टर मध्ये जिथे दाट वस्ती आहे यामध्ये मध्य धारावी, कुंभारवाडा,कोळीवाडा, सोशल नगर, शिवशक्ती नगर, ढोर वाडा, धारावी ट्रान्झिट कॅम्प, नेहरू नगर यासारख्या भागात राहणाऱ्या धारावीकरांना या पुनर्विकासामुळे मोठा दिलासा मिळणार आहे


या पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांना साडेतीनशे ते चारशे स्क्वेअर फिट घर मिळावे अशी मागणी केलेली आहे


सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे मात्र या प्रकल्पाला दहा ते बारा वर्षे पूर्ण होण्यास लागतील असं कंपन्यांकडून सांगण्यात आलंय


पुनर्विकास झाल्यास प्रॉपर्टी रेट मध्ये सुद्धा 30 ते 40 टक्के वाढ होऊन याचा मोठा आर्थिक फायदा भविष्यात धारावीकरांना होईल


मात्र पुनर्विकास होत असताना अदानी कंपनीची बोली सरस ठरल्यानंतर काही जणांनी या निविदा प्रक्रिये संदर्भात शंका घेतली आहे तर या पुनर्विकास प्रकल्पामुळे मोठा आर्थिक फायदा अदानी कंपनीला होणार असल्याचा सुद्धा सांगितले जात आहे.


या पुनर्विकास प्रकल्पामुळे अदानी कंपनीला कोट्यावधीचा आर्थिक फायदा होणार होईल... सोबतच अशा प्रकल्पाच्या  री डेव्हलपमेंट मुळे या कंपनीचे जागतिक पातळीवर नेटवर्क वाढेल आणि एक नामांकित कंपनी म्हणून अदानीकडे भविष्यात पाहिलं जाईल... धारावीकरांचे स्वप्न जरी सतत उतरत असलं तरी अजूनही धारावीकरांच्या मनात अनेक शंका प्रश्न आहेत.  
 
जगाच्या पाठीवर या धारावीला एक वेगळं स्थान आहे. धारावीच्या झोपडपट्टीत  राहणाऱ्या प्रत्येकाने कधी कन्हत कधी दुखत कधी आनंदात आपल्या लहान झोपड्यात दिवस काढलेत... आणि हेच दिवस काढत असताना आपण सुद्धा एक दिवस या झोपडीतून आपल्या हक्काच्या घरात, स्वतःच्या घरात जाऊ असं स्वप्न अनेकांनी अलीकडच्या काळात साखर झोपेत पाहिला असणार... कारण हेच साखर झोपेतलं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे... कारण धारावी बदलणार आहे ..तिचं रूपडं पालटणार आहे... त्यामुळे आता धारावीकरांनी पाहिलेल्या स्वप्नातली धारावी या पुनर्विकासात निर्माण होईल.