मुंबई : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भायखळा (Mumbai) परिसरात निर्माणधीन बांधकाम करताना झालेल्या अपघातात दोन कामगारांची मातीच्या ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येथील हबीब मेन्शन येथे इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलचा काही भाग कामगारांवर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत (Accident) एकूण 5 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली आले होते. अपघाताच्या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Continues below advertisement

भायखळा निर्माणधीन इमारतीच्या पायाभरणीदरम्यान, झालेल्या अपघात दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण दुर्घटनेत 5 जखमींची नोंद मुंबईतील नायर रुग्णालयात करण्यात आली आहे. जखमींमधील दोघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार राहुल (वय 30 वर्षे) आणि राजू (वय 28 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातातील जखमींची नावे

1.सज्जाद अली (वय २५ वर्षे) जखमी, स्थिर2.सोबत अली (वय २८ वर्षे) जखमी, स्थिर3.लाल मोहम्मद (वय १८ वर्षे) जखमी, स्थिर.

Continues below advertisement

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये भाषेवरुन वाद

पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये मराठी आणि अमराठी प्रवाशांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये उभे राहण्याच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद थेट भाषेवर पोहोचला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका प्रवाशाने दुसऱ्याला, 'मराठी का नाही येतं? याचं मला उत्तर दे?' असा जाब विचारल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि 'मला हात लावायचा नाही' असे एक प्रवासी म्हणत असताना हा वाद वाढत गेल्याचे दिसून येते. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, मुंबईच्या लोकल ट्रेनमधील भाषिक वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हेही वाचा

...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा