मुंबई : मुंबईत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. झवेरी बाजारातील तीन मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा पांढरा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चेनाजी नरसिंहजी ज्वेलर्स, देव बुलियन आणि श्री बुलियन या तीन ज्वेलर्सवर आयकर विभागाना छापा टाकला आहेत. या दुकानांच्या मालकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा कर्मचाऱ्याच्या खात्यात टाकून त्यांच्याकडून चेक घेतला. मात्र आम्ही सोन्याची विक्री केल्याचा दावा ज्वेलर्स करत आहेत. परंतु विकलेल्या सोन्याचा हिशेब मात्र त्यांना देता आला नाही. आयकर विभागाने आज सकाळी छाप्याला सुरुवात केली. सुमारे 100 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. मात्र हा आकडा 500 कोटी रुपये असू शकतो, असा आयकर विभागाचा अंदाज आहे. या तीन ज्वेलर्सवर छापा
  1. चेनाजी नरसिंहजी ज्वेलर्स
मालक  अशोक जैन पत्ता : मुंबादेवी रोड, शॉप नंबर 5
  1. देव बुलियन
मालिक : एम के राजेश पत्ता : 13 भगवती निवास, ओल्ड सट्टा बाजार, काळबादेवी
  1. श्री बुलियन
मालक : सुनील मेहता पत्ता : दुसरा मजला, मोतीलाल मेन्शन, एसएम स्ट्रीट, झवेरी बाजार