मुंबई : प्रकल्प रखडवणाऱ्या विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएने चांगलाच दणका दिला आहे. गेली अनेक वर्ष ज्या झोपडपट्टी पुनर्विकासांची कामं रखडली आहेत, अशा 24 विकासकांच्या प्रकल्पांच्या परवानग्याच एसआरएने रद्द केल्या आहेत.


याशिवाय 208 विकासकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवणाऱ्या विकासकांना झटका बसला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कारवाई केलेल्या विकासकांमध्ये अनेक मोठ्या बिल्डर्सची नावं असल्याचंही समजतं.

दरम्यान, झोपडपट्टीधारकांना आपल्या पसंतीचाच विकासक निवडण्याची मुभाही देण्यात आली आहे.