मुलुंडमध्ये भिंत कोसळून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 24 Sep 2016 08:06 AM (IST)
मुंबई : मुलुंडच्या शास्त्रीनगर भागात रात्री एका इमारतीची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत 17 वर्षांच्या मुलाचा भिंतीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात घरांवर भिंत कोसळून जवळपास 11 जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. ही भिंत टेकडीजवळ असल्याने कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही तासांत राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.