Antilia Explosives Scare Live Updates | गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यातील बैठक संपली, सुमारे दीड तास चर्चा

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एएनआयकडे सोपवावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2021 07:58 PM
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या बैठक सुरु, गृहमंत्र्यांच्या 'ज्ञानेश्वरी' या निवासस्थानी बैठकीला सुरुवात
मनसुख हिरेन यांचं पार्थिव ठाण्यातील निवासस्थानी दाखल, इमारतीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त, मृतदेह काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवणार, त्यानंतर अंत्यसंस्कार होणार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यातील बैठक संपली, गृहमंत्र्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी सुमारे दीड तास चर्चा, आतापर्यंतच्या तपासात काय निष्पन्न झालं? तपासाची पुढील दिशा काय असेल? यावर चर्चा झाल्याची माहिती, ठाणे आणि मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास तसंच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयकडे जाण्याची शक्यता, मुंबई पोलिसांतील सूत्रांची माहिती, सध्या एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे, मुंबई पोलिसांनी तपास थांबवलेला आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह कुटुंबीय ताब्यात घेणार आहेत, सोसायटीची अॅम्ब्युलन्स मृतदेह घेण्यासाठी कळवा हॉस्पिटलकडे रवाना झाली आहे. तसंच अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह कुटुंबीय ताब्यात घेणार आहेत, सोसायटीची अॅम्ब्युलन्स मृतदेह घेण्यासाठी कळवा हॉस्पिटलकडे रवाना झाली आहे. तसंच अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याआधी 12 ते 24 तासांपूर्वी मृत्यू, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट नाही
मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन यांचा अहवाल एबीपी माझाच्या आधी, मृतदेह सापडल्याच्या 12 ते 24 तास आधी मृत्यू, शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत, मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जोपर्यंत पीएम रिपोर्ट देत नाही तोपर्यंत मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर पोलीस आता शवविच्छेदन अहवाल घेऊन त्यांच्या घरी पोहोचले आहेत. कुटुंबीयांना पीएम रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जातील. तिथे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन तो घरी आणला जाईल. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मंगलप्रभात लोढा, संजय केळकर आणि निरंजन डावखरे हे तिन्ही भाजप आमदार कुटुंबियांची भेट घेऊन निघाले,
भेटी नंतर बोलण्यास दिला नकार,
पीएम रिपोर्ट आल्यानंतर बोलण्याची शक्यता
#BREAKING मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याआधी 12 ते 24 तासांपूर्वी मृत्यू, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट नाही
मुंबई पोलिस कमिशनर परमवीर सिंह यांनी API सचिन वाझेंसोबत तीन तास बैठक घेतली. बैठकीतून निघाल्यानंतर वाझे यांनी तावडे नामक अधिकाऱ्याबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं. मनसुखच्या तक्रारीत तुमचं नाव आहे, असं विचारलं असता सीपी साहेब याचं उत्तर देतील असं वाझे म्हणाले. वाझे म्हणाले की, या प्रकरणाची कागदपत्रं अद्याप एटीएसला सोपवलेली नाहीत. मनसुखच्या ऑटोप्सी रिपोर्टमध्ये एक्सटर्नल इंज्यूरी नाही, असंही वाझेंनी म्हटलंय.
भाजप आमदार मंगलप्रभात लोढा मनसुख यांच्या घरी पोहोचले, थोड्याच वेळात ठाणे क्राईम ब्रांचची टीमही चौकशीसाठी दाखल होणार

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, सुरक्षा यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, गिरीश महाजनांची मागणी
आमची गाडी आठ दिवसांआधी चोरीला गेली होती. त्यांनी पोलिसांना चौकशीत सहकार्य केलं होतं. पोलिसांना भेटायला जातो असं सांगून ते गेले, पण परतलेच नाही. मनसुख हिरेन कधीच आत्महत्या करु शकत नाही. त्यांच्या मृत्यू मागचं सत्य समोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली आहे.
मुकेश अंबानी धमकी प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करणार, आधी केवळ मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करणार होतं मात्र आता दोन्ही प्रकरणांची चौकशी महाराष्ट्र एटीएस करणार
दुपारी साडे अकरा ते 12 पर्यंत मनसुख यांची बॉडी घरी यायची शक्यता आहे,
तर 4 वाजेपर्यंत किंवा त्याच्या आधी पी एम रिपोर्ट येण्याची शक्यता आहे,
मनसुख यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे,
नौपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित आहेत,
सचिन वाझे यांनी अर्णव गोस्वामींना तुरुंगात टाकलं म्हणून राग आहे, असं वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलं होत. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इतक्या खालच्या स्तरावर जाऊन उत्तर देणं हे गृहमंत्र्यांना न शोभणारं. कोणतीही उत्तरं नसल्यावर अशी वक्तव्ये केली जातात. एक गोष्ट लक्षात आली की आम्ही इतके पुरावे दिले की गृहमंत्री निरुत्तर झाले. त्यांनी भटकवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल अयशस्वी झाला आहे."
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं, खाडीतून बाहेर काढताना हिरेन यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल बांधले होते.
सरकार या प्रकरणी गंभीर नाही. सरकारनेच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यायला हवा. मी या प्रकरणातील सर्व पुरावे केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवणार आहे.
केंद्राची संस्था असो की राज्याची असो सगळ्यांबद्दल आदर आहे. विरोधी पक्षाच्या महितीसाठी सांगतो, सुशांत सिंह राजपूतबाबत चर्चा झाली, सीबीआयकडे प्रकरण सोपवलं. सहा महिन्यात काय केलं? एक वाक्य बोलत नाही. विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे, जे पुरावे आहेत ते द्या मदत होईल. : गृहमंत्री
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली गाडी आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात थक्क करणारे योगायोग आहेत. विधानसभवनात गृहमंत्र्यांनी या प्रकरणी थातुरमातुर उत्तरं दिली. यात नक्कीच काळबेरं आहे. गृहमंत्री नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीत साध्या जिलेटिनच्या कांड्या होत्या, बॉम्ब नव्हते. पोलिसांवर विश्वास आहे. इतके पुरावे विरोधी पक्ष नेता देतो, हवेत बोलत नाही. एकूण एक कागद दिले आहे. त्याला तुम्ही राजकीय वळण देत आहात. सचिन वझे काळा की गोरा माहित नाही. त्याने कोणाला मारलं, ठोकलं माहित नाही. जो मुख्य साक्षीदार आहे त्याला सुरक्षित ठेवू शकलो नाही. : देवेंद्र फडणवीस
गंभीर विषयावर चर्चा सुरु आहे. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे जावं ही मागणी आहे. भीमा कोरेगाव तपास राज्याला विचारलं नाही ना. विषय गंभीर आहे. इकडे मागणी केली जीवाला धोका आहे आणि नंतर मृतदेह सापडला. विषय गंभीर आहे. पोलिसांवर विश्वास आहे की नाही? सचिन वाझे नावाचा अधिकारी तपास करत असेल तर त्याच्यावर अविश्वास तयार करणे योग्य नाही. या घटनेचं गांभीर्य घेतलं आहे. पोलीसांचं अभिनंदन करतो : नाना पटोले
सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पलटवार; विधानसभेत मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यावरुन खडाजंगी
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस वकील आहेत. आशिष शेलार वकील आहे. त्यांन प्रक्रिया माहित आहे. आपण जबाब वाचून दाखवला. प्रत्येक माणूस जबाब खरा देतोच की असं नाही. गृहमंत्र्यांना पोलीस माहिती देतात. ज्याच्या विश्वासावर राज्य केलं ते माझे पोलीस असं एकेकाळी म्हणत होते, आता पोलीस बदलले का? पोलिसांच्या कर्तृत्वावर शंका आहे का? सकाळी मृतदेह सापडली, आपण दुपारी बोलले आहेत. वेळ द्याल की नाही? सगळे युनिट काम करत आहे. केवळ आपण सांगितलं म्हणून आपलं म्हणणं खर मानतो. आपल्या माहितीच्या आधारावर तपास करुन सत्य बाहेर येईल. लगेच एनआयए चौकशी करा म्हणताय? पोलिसांवर विश्वास आहे की नाही? : अनिल परब
गृहमंत्र्यांच्या उत्तरात विसंगती आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी मनसुख हिरेन नावाच्या माणसाचे स्टेटमेंट वाचून दाखवलं. त्याचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांच्या हेतूवर शंका नाही. दुसऱ्या व्यक्तीकडून गाडी घेतली, मृत झाल्यावर सांगत आहेत ती गाडी त्याची नव्हती. जो महत्वाचा दुवा आहे. ज्याने गाडी वापरली त्यात स्फोटक होती. तो मुख्य साक्षीदार आहे किंवा आरोपी.
प्रत्यक्षदर्शी असेल तर त्याला संरक्षण दिलं नाही आणि आरोपी असेल तर त्याला मोकळं सोडलं. दक्षिण मुंबईत गाडीत स्फोटकं आली सुरक्षा देऊ शकले नाही. मृत्यूनंतर काळंबेर आहे. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. तुम्ही वाचवायला यशस्वी झाले नाही. वाझे असेल आम्ही त्याला घाबरत नाही. तो अर्णवकडे जाऊ दे कुणाकडे जाऊ दे. आम्ही घाबरत नाही. तपास एनआयएकडे गेला पाहिजे. : आशिष शेलार
गृहमंत्र्यांनी शब्द मागे घ्यावे, अर्णव गोस्वामी अटक केली म्हणून नाव घेतलं असं बोलणं हे राजकीय पाप आहे. आंतरराष्टीय कट असू शकेल अशी चर्चा. ही घटना झाल्यावर सरकारने स्वतःहून बोललं पाहिजे. अनिल देशमुख म्हणतात मुंबईत वीज गेली तर चायना अटक असू शकतो. इथे संशय सभागृह व्यक्त करत आहे. तर गृहमंत्री एनआयएला चौकशी देत नाही
या घटनेने संशय निर्माण होतो. सभागृहात सरकार दुराग्रही भूमिका घेते तेव्ह अध्यक्षांनी आदेश द्यावेत. : सुधीर मुनगंटीवार
सचिन वाझे यांनी अर्णव गोस्वामींना तुरुंगात टाकलं म्हणून राग आहे. सचिन वाझे यांनी सात दिवस अन्वय नाईक प्रकरणात काम केलं. जी माहिती आहे ती द्या, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस सक्षम आहे : गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत आहे. कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? ओलाकडून माहिती घ्या
यातला दुवा कोण मनसुख हिरेन होता. त्यांची गाडी बंद पडली. ती गायब झाली. विरोधी पक्ष नेत्यांनी माहिती आम्हाला द्या. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस सक्षम आहेत. : देवेंद्र फडणवीस
मृतदेहाचे हात बांधलेले नाहीत. पोलीस तपास करायला सक्षम आहेत. नितीन अनंत कुरे हे या प्रकरणी तपास करत आहेत. आधी सात दिवस सचिन वाझे तपास करत होते, तीन दिवसांपूर्वी आयओ बदलला आहे : गृहमंत्री
मनसुख हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे की, घरगुती वापराकता ती मी गाडी विकत घेतली. त्याचं स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले?
सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस
स्कॉर्पिओ गाडीचे मूळ मालक सॅम पीटर न्यूटन होते. त्यांनी
इंटिरिअरसाठी दिली होती. पैसे दिले नाही म्हणून ही गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती : गृहमंत्र अनिल देशमुख
मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर इथे सापडला, त्यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत नव्हती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समजेल. ठाणे पोलीस याचा तपास करत आहेत : गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यातील बैठक संपली. गृहमंत्री विधानसभेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला ही गंभीर घटना आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह विधानभवनात पोहोचले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि कार मालकाचा संशयास्पद मृत्यू याबाबत परमबीर सिंह गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहिती देणार आहेत.
मनसुख हिरेन कोणत्याही तणावात नव्हते, इमारतीमधील रहिवाशांची माहिती
मनसुख हिरेन यांना सुरक्षा द्यायला सांगितली होती. हे प्रकरण तात्काळ एनआयएकडे सोपवावं. गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती द्यावी : देवेंद्र फडणवीस
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून बेपत्ता असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत सापडला.

पार्श्वभूमी

मुंबई : मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विधानसभेत बोलताना त्यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचा घटनाक्रमासह अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर आरोप केले.


 


मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि सचिन वझे
देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. एकच गाडी नव्हती, स्कॉर्पिओपाठोपाठ आणखी एक गाडी आली. दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. ही गाडी तिथे पार्क होती, तिची ओळख पटल्यानंतर सर्वात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वझे तिथे पोहोचले. कोणीही पोहोचण्याच्याआधी ते आले, क्राईमचे पोलीस आहे, मग स्थानिक पोलीस आले. मग सचिन वझेंना आयओ म्हणून अपॉईंट केलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपींना आयओ म्हणून नेमलं. सचिन वझेंना का काढलं? हे मला समजलं नाही. पण यात योगायोग आहे. माझ्याकडे सीडीआर आहे, गाडीमालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली, ती गाडी अंबानींच्या घराबाहेर उभी होती. त्यांनी आपल्या जबाबात एक टेलिफोन नंबर सांगितला आहे. या नंबरचा एका नंबरशी संवाद 8 जून 2020, 25 जुलै 2020 त्यानंतर अनेक वेळा दिसतोय. हा नंबर आहे, सचिन हिंदुराव वझे. ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला घेऊन क्रॉफर्ड मार्केटला गेला. तिथे पोलीस आयुक्तांचं ऑफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? हा माझा प्रश्न आहे. हे जर काढलं तर सोपं आहे. ओलामध्ये बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे. ओलाच्या ड्रायव्हरने त्याला पाहिलंय, तो कोणाला भेटला हे पाहिलं आहे. अशा परिस्थितीत एवढे योगायोग कसे हे समजत नाही. वझे ठाण्यात राहणारे, ज्याची गाडी घरासमोर पार्क केली तोही ठाण्यात राहणारा, घटनेच्या कितीतरी दिवसांपूर्वी त्यांचं फोनवरुन संभाषण झालं आहे. म्हणजे ते एकमेकांना ओळखतात. खूप मोठे प्रश्न निर्माण झाले. ती गाडी दिसल्यावर पहिल्यांदा तिथे वझे पोहोचले. स्थानिक पोलीस नाही, क्राईम पोलीस नाही तर ते पोहोचले. हे धमकीचं पत्र वझेंनाच मिळालं, त्यांनीच तिथे डिलिव्हर केलं. मग त्यानंतर योगायोग पाहा. टेलिग्राम चॅनल तयार होतं. जैश-उल-हिंद नावाने पत्र दाखवलं जातं, जणू खंडणी मागण्याकरता हे करण्यात आलं. मात्र जैश-उल-हिंद म्हणतं हे आमचं पत्रच नाही. खूप मोठी शंका या प्रकरणात तयार झाली आहे. म्हणून माझी मागणी आहे, हे पुरावे शंकेला वाव देणारे आहेत. ही टेरर अॅक्टिव्हिटी आहे, कारण जिलेटिन होतं. जैश-उल-हिंदचं नावं आलेलं आहे, उडवून देण्याची धमकी आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी एनआयएकडे द्यावी. हे योगायोग काय आहेत, याची चौकशी एनआयएने करावी, अशी माझी मागणी आहे."


 


मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने खळबळ
26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलियापासून अवघ्या 600 मीटर अंतरावर ही कार पार्क केली होती. जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणारे लोक कोण होते, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.


 


अंबानी कुटुंबाला पत्राद्वारे धमकी
मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आणि धमकीचं पत्र आढळून आल्यानं खळबळ उडाली. चिठ्ठीत लिहिलं की, "नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या." घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो कार ही काही दिवसांपूर्वीच चोरीला गेली होती. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.