आज सकाळी मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत अफरोझ शाह आणि त्यांचे काही सहकारी फिरत असताना सकाळी 10 च्या आसपास त्यांना कासवांची पिल्ले दिसले. अफरोझ शाह यांनी तातडीने पर्यावरण अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली.
मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर खूप वर्षांनी अशा प्रकारे इतक्या संख्येने कासव दिसले. मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर ओलिव्ह रिडेल आणि ग्रीन सी टर्टल प्रजातीची कासवे सापडतात. वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्ले ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत. या पिल्लांच्या कवचाचा रंग फिकट गुलाबी हिरवा असतो.
नोव्हेंबर ते मार्च हा प्रजजनाचा कालावधी असतो. कासवाची मादी अंडी किनाऱ्यावर खड्डा करुन त्यामध्ये अंडी घालून समुद्रात परतते. त्यांनतर 45 ते 50 दिवसांनी त्यामधून पिल्ले बाहेर येतात.
दरम्यान, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील या कासवाच्या पिल्लांना पर्यावरण अधिकारी आणि वनविभागाने समुद्रात सोडले.
पाहा व्हिडीओ :