- एसआरए प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी म्हणून तीन अधिकारी
- मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेसाठी तीन वेगळे सीईओ
महाराष्ट्र नेचर पार्कचं आरक्षण कायम राहणार
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2018 12:20 PM (IST)
सरकारने माहीम इथल्या नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध केला.
फोटो : राजेश वराडकर
मुंबई: माहीम नेचर पार्क उद्यानाचं आरक्षण कुठल्याही स्थितीत रद्द करणार नाही, ते कायम ठेवू अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत केली. सरकारने माहीम इथल्या नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध केला. कुठल्याही स्थितीत मुंबईतील नेचर पार्क उद्ध्वस्थ होऊ देणार नाही. वेळ आली तर त्यासाठी रस्त्यावर उतरु अशी भूमिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर आता वायकर यांनी ही घोषणा केली. धारावीच्या विकासासाठी निसर्ग उद्यान गिळंकृत करण्याचा घाट? मुंबईत अशा काही जागा आहेत, जिथे गेल्यावर आपण मुंबईत आहोत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अशीच एक जागा म्हणजे धारावीजवळ असणारं महाराष्ट्र नेचर पार्क. हे पार्क आजूबाजूला फोफावलेल्या मुंबईत स्वत:चं अस्तित्व राखून आहे. एकेकाळी ही जागा डम्पिंग ग्राऊंड म्हणून ओळखली जायची. पण अख्ख्या मुंबईचा कचरा पोटात घेणाऱ्या या जागेवर नंदनवन फुललं. आजूबाजूला आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतलं प्रदूषण, कचरा, दुर्गंधी नांदत असतानाही इथे मात्र एक वेगळं जग जन्माला आलं. पण सरकारने याच नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र शिवसेनेच्या प्रचंड विरोधामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. एसआरएसाठी आता तीन सीईओ