मुंबई: राज्यभर आपली कृपा दाखवल्यानंतर अखेर मान्सूनराजा परतला आहे. मात्र यंदाच्या वर्षी मान्सूनराजानं सर्वाधिक काळ महाराष्ट्र मुक्काम केला. 19 ऑक्टोबरला म्हणजेच तब्बल 23 दिवस उशीरानं मान्सूननं महाराष्ट्रातून एक्झिट घेतली आहे.
गेल्या 6 वर्षातली ही सर्वात उशीराची एक्झिट आहे. यंदा मान्सूननं राज्यभर आपली कृपादृष्टी दाखवली आणि महाराष्ट्राला ओलचिंब केला.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तब्बल 9 वर्षांनंतर जायकवाडी धरण 100 टक्के भरलं. तर दुष्काळी मराठवाड्यातलीही सगळी धरणं भरली आहेत. त्यामुळं मान्सूनचा हा लांबलेला मुक्काम महाराष्ट्राच्या फायद्याचाच ठरला असं म्हणावं लागेल.