मुंबई : मुंबईची मोनोरेल पुन्हा एकदा रखडली आहे. तांत्रिक बिघडामुळे अडकलेल्या पहिल्या मोनोरेलला काढण्यासाठी आलेली दुसरी मोनोरेलही अडकली आहे.

 

सकाळी 6 वाजताच्या सुमाराला भक्तीपार्कजवळ एक मोनोरेल अडकली आणि ती काढायला दुसरी मोनोरेल आली. मात्र, दुसरीही मोनोरेल अडकली.

 

सकाळी 6 वाजल्यापासून दोन्ही मोनोरेल अडकल्या असून, दुरुस्तीचं काम अद्यापही सुरु आहे. गेल्या दोन तासापासून प्रवासी लटकले आहेत.

 

हे दृश्य पाहून काही काळ नागरिकांमधे कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं होतं.