मुंबई : राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया, अशी टीका करणाऱ्या एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना मनसेने उत्तर दिलं आहे. आज राज ठाकरेंच्या सभांना, मोर्चांना लाखोंची गर्दी होते ती म्हणजे बुझा हुआ दिया आहे का? दीड वर्षांनतर निवडणूक आहे, कोण बुझतंय ते कळेल त्याला, असं मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार म्हणाले.


"तसंच वारिस पठाण मूर्ख माणूस आहे तो, त्याला प्रसिद्धी देण्यात काही गरज नाही. असे भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्ती, त्याच्या डौलातच चालतो. कुत्ते भौंकते है हाथी चलता है. तरी देखील माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा आहेत त्याला," अशी टीकाही त्यांनी केली आहे.

वारिस पठाण यांची टीका
मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरुन मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादात एमआयएमने उडी घेतली आहे. हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हान एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया, अशी टीकाही पठाण यांनी केली.

मनसेने जर भायखळ्यात तोडफोड केली तर आम्ही त्याला जशाच तसे उत्तर देऊ. जशाच तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याने ते आमच्या भागात येत नाहीत, असं वारिस पठाण म्हणाले. मनसेची तोडफोड म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे, असं टीकास्त्रही वारिस पठाण यांनी सोडलं.

राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया : वारिस पठाण

वारिस पठाणांना लॉटरी लागून आमदारकी मिळाली!
यावर उत्तर देताना मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार म्हणाले की, "कोण आहे हा मूर्ख वारिस पठाण. त्याची लायकी काय आहे? हा त्यावेळच्या मतविभागणीमध्ये निवडून आलेला, लॉटरी लागून आमदारकी मिळाली आहे. त्याचं योगदान काय आहे समाजासाठी? साडेतीन वर्षात ह्याने काय केलं? कॅमेरा आणि व्हिडीओ फोकस करण्यासाठी अशी वादग्रस्त विधानं करायची. ह्याचा संबंधं काय ह्या विषयाशी? भायखळा 80 टक्के फेरीवालामुक्त आहे. रेल्वे परिसर फेरीवालामुक्त पाहिजे हा आमचा मूळ मुद्दा आहे. तिथे जर क्लिअर असेल तर तिथे जाऊन कोणाला मारण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारवाई बीएमसी आणि पोलिसच करत आहेत. हा केवळ प्रसिद्धी स्टंट आहे. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रसिद्धी मिळवण्याचा ह्याचा प्रयत्न असतो. साडे तीन वर्षात आमदार म्हणून ह्याने काय उल्लेखनीय काम केलंय की ज्याची प्रसिद्धी मिळाली आहे. पुढच्या दीड वर्षात कळेल त्याला, मतदानात विभागणी झाली आणि लॉटरी लागली. त्यामुळे अशा मूर्ख लोकांच्या स्टेटमेंटची दखल घेण्याची काहीही गरज वाटत नाही आम्हाला."

तरीही त्याला माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा!
राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा अशी टीका वारिस पठाण यांनी केली. त्यावर किल्लेदारांनी उत्तर दिलं की, "लोकप्रतिनिधी निवडून आले म्हणजे माणूस मोठा असतो, असं नाही. आज राज ठाकरेंच्या सभांना, मोर्चांना लाखोंची गर्दी होते ती म्हणजे बुझा हुआ दिया आहे का? दीड वर्षांनतर निवडणूक आहे, कोण बुझतंय ते कळेल त्याला. मूर्ख माणूस आहे तो, त्याला प्रसिद्धी देण्यात काही गरज नाही. असे भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्ती, त्याच्या डौलातच चालतो. कुत्ते भुंकते है हत्ती चलते है. तरी देखील माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा आहेत त्याला."

संबंधित बातम्या

मनसे नेते संदीप देशपांडेसह आठ जणांना पोलिस कोठडी

परप्रांतीय भटका कुत्रा, निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचं होर्डिंग

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे

संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

काँग्रेस कार्यालय तोडफोड: संदीप देशपांडेंना अटक

मनसेच्या भित्र्या, नपुंसक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे 

मनसेच्या भित्र्या, नपुसंक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम

पाहा व्हिडीओ