लोअर परळमधल्या फिनिक्स मॉलमधल्या पीव्हीआरमध्ये जेव्हा मनसे कार्यकर्ते चित्रपट पाहायला गेले, त्यावेळी त्यांनी बाहेरुन खाद्यपदार्थ आणल्याने त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली.
एक ऑगस्टपासून थिएटरमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारनं घेतला होता, मात्र याबाबत कोणतेही लेखी आदेश आमच्यापर्यंत आलेच नाहीत, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांना बाहेरचं खाद्यपदार्थ आणल्याने आत जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. थिएटर प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
मनसेच्या राड्यावर नवाब मलिक काय म्हणाले?
सरकार एखादी घोषणा केल्यानंतर आपली जबाबदारी पार पाडत नाही, म्हणून ही तोडफोड होते. विधिमंडळात घोषणाबाजी करतेय, पण अंमलबाजवणी करत नाहीय, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मनसेची बाजू घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.
बातमीचा व्हिडीओ :