मनसे कार्यकर्त्यांची गुंडगिरी, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 12:11 PM (IST)
मुंबई: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुंडगिरी आज मुंबईत बघायला मिळाली. खराब रस्त्याची पाहणी करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कांदिवली पूर्व परिसराचा विभाग अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निकृष्ट दर्जाचा रस्त्याची पाहणी सुरु होती. त्यावेळी खराब रस्त्याचं कारण सांगून कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. दरम्यान, मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात मनसेनं आज अनोखं आंदोलन केलं. मनसेनं मुंबईत ठिकठिकाणी सेल्फी आंदोलन केलं. यामध्ये मोठ्या संख्येनं मनसैनिकांनी सहभाग घेतला. शिवसेनेनं करुन दाखवले नसून खड्डे पाडून दाखवले असा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला. मुंबईतल्या खड्ड्यांवर तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला. VIDEO: