''मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचं पालन करत नाही, हिंसेचं राजकारण करतात. 2014 मध्ये राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, भाजपचे आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत,'' असंही निरुपम म्हणाले.
मनसेकडे मतं आहेत, का, असतील तर ते त्यांना लाभो, असं म्हणत मनसे महाआघाडीचा भाग होणार नाही, असं निरुपमांनी स्पष्ट केलं. या प्रस्तावाचा महाआघाडीवर परिणाम होऊ नये, अशी आशा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे कळवलं असल्याचं निरुपम म्हणाले.
राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही - सूत्र
आतापर्यंत मनसे-राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चा होत्या, मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चांना दुजोरा दिलाय. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आली नाहीय. मात्र, राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवल्याने त्यांची सहमती असल्याचे प्रथमदर्शन दिसून येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं दिसण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपची देशात सुरु असलेली विजयी घोडदौड पाहता, देशातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विरोधकही एकीने लढण्याच्या तयारीचे संकेत देत आहेत.
आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससमोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार, मनसेला सोबत घेण्याची विनंती केलीय. आगामी विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकीत मनसेला सोबत घ्यायला हवं. शहरी भागात मनसेची पकड मजबूत आहे. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो, असे राष्ट्रवादीकडून प्रस्तावात म्हटले आहे.
मुंबईत काही दिवसांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं. मात्र, काँग्रेसने या प्रस्तावाल विरोध करत मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातमी :