MNS March Live | माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंची तोफ धडाडली

राज ठाकरे यांनी सीएएला विरोध तर एनआरसीचं समर्थन केल्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Feb 2020 04:48 PM
२०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे : राज ठाकरे
अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे : राज ठाकरे
माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे : राज ठाकरे
सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो : राज ठाकरे
देशभरात मुसलमानांनी जे मोर्चे काढले, त्याचा अर्थ मला लागला नाही. जे जन्मापासून इथे राहतात त्यांना कोण बाहेर काढणार? तसं कायद्यात नव्हतं तर ताकद कुणाला दाखवली,काय म्हणून दाखवली? : राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आझाद मैदान येथील भाषणाचे थेट प्रक्षेपण...
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा : लाखोंच्या संख्येने मनसैनिक रस्त्यावर
मनसेच्या महामोर्चाला सुरुवात, राज ठाकरे सहकुटुंब सहभागी, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल
मनसेच्या मोर्चाच्या निमित्ताने 'अमर ज्योत स्मारकाला' पोलिसांची कडेकोट सुरक्षा. याच अमर ज्योतचे चित्र दाखवून मनसेने एका व्यापक राजकीय प्रवासाला सुरुवात केलीय. काही वर्षांपूर्वी 'अमर जवान ज्योतीची' रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी नासधूस आली होती. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. आज पुन्हा राज ठाकरे अशाच पद्धतीने बांगलादेशी-पाकिस्तानी घूसखोरांविरोधात मोर्चा काढत आहेत ज्यात या 'अमर जोती स्मारकाला' विशेष महत्व आहे.
मनसेच्या मोर्चाच्या निमित्ताने 'अमर ज्योत स्मारकाला' पोलिसांची कडेकोट सुरक्षा. याच अमर ज्योतचे चित्र दाखवून मनसेने एका व्यापक राजकीय प्रवासाला सुरुवात केलीय. काही वर्षांपूर्वी 'अमर जवान ज्योतीची' रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी नासधूस आली होती. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. आज पुन्हा राज ठाकरे अशाच पद्धतीने बांगलादेशी-पाकिस्तानी घूसखोरांविरोधात मोर्चा काढत आहेत ज्यात या 'अमर जोती स्मारकाला' विशेष महत्व आहे.
महामोर्चात सहभागी होण्याआधी राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं
माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, रविवारी माझ्या बस रिकाम्या असतात. त्यामुळे कार्यकर्ते माझी वाहनं मनसेच्या मोर्चाला घेऊन गेली असतील, असं स्पष्टीकरण भाजप आमदार महेश लांडगेनी दिलंय. सीएए आणि एनआरसी हा देशहिताचा कायदा, त्यामुळे याच्या समर्थनार्थ मोर्चासाठी माझे कार्यकर्ते मुंबईला गेले असतील, अशी कबुली ही लांडगे यांनी यावेळी दिली. लांडगे हे भोसरी विधानसभेतील भाजपचे आमदार आहेत. पुण्यातून मनसेच्या महामोर्चासाठी मुंबईला निघालेल्या कार्यकर्त्यांच्या बसवर लांडगे यांचे नाव असल्याचं एबीपी माझाने समोर आणलं होतं. त्यामुळं भाजप मनसेच्या महामोर्चाला हातभार लावत असल्याची चर्चा होती.
मनसे महामोर्चा : मनसे प्रमुख राज ठाकरे महामोर्चासाठी रवाना, काही क्षणात मोर्चात सहभागी होणार
मनसेचा महामोर्चा : थोड्याच वेळात मनसे प्रमुख राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार. कृष्णकुंजवरून थेट एबीपी माझाचे थेट प्रक्षेपण
कल्याण-डोंबिवलीतून १५ हजार कार्यकर्ते मोर्चासाठी रवाना, अबू आझमीच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, शिवसेनेच्या टीकेला शहराध्यक्ष राजेश कदम यांचं उत्तर
चेंबूरमध्ये मनसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धभिषेक करून या मोर्चाला निघण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दूध, दही, तुपाने अभिषेक करीत कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. चेंबूर मधून मनसेचे शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभाग घेणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून CAA या राष्ट्रीय भावनेचा सन्मान करणाऱ्या कायद्याला सर्वांनी समर्थन करण्याचं आवाहन. मनसेसह शिवसेनेलाही CAA कायद्याला समर्थन देण्याची साद. CAA या कायद्याला समर्थन देणाऱ्या सर्वांचं 'मन से' आणि 'दिल से' स्वागत करणार असल्याची भावना.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून CAA या राष्ट्रीय भावनेचा सन्मान करणाऱ्या कायद्याला सर्वांनी समर्थन करण्याचं आवाहन. मनसेसह शिवसेनेलाही CAA कायद्याला समर्थन देण्याची साद. CAA या कायद्याला समर्थन देणाऱ्या सर्वांचं 'मन से' आणि 'दिल से' स्वागत करणार असल्याची भावना.
हिंदू जिमखाना इथं औरंगाबादहून आलेले सुरेश सुर्यवंशी हे मनसैनिकांच्या हातावर टॅटू काढत आहेत. कॅलिग्राफी आर्टिस्ट असलेले सूर्यवंशी यांनी राज्यभरात निघालेल्या शांततापूर्ण मराठा मोर्चांदरम्यानही आपली कला सादर केली होती. 'राजसाहेब' यांच नाव आपल्या हातावर गोंदवून आणि आझाद मैदानात आज राज ठाकरे जे विचार मांडतील, जो संदेश देतील तो आदेश मानून आपापल्या जिल्ह्यात परतण्याचा मनोदय मनसे कार्यकर्त्यांनी हिंदू जिमखाना इथं व्यक्त केला.
मनसेचा महामोर्चा : थोड्याच वेळात राज ठाकरे कृष्णकुंजवरुन रवाना होणार
मनसेचा महामोर्चा : मोर्चाआधी दादरच्या राममंदिरात मनसे कार्यकर्त्यांकडून आरती.
एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून ढोल ताशाच्या गजरात 10 हजार कार्यकर्ते पाचशे हून अधिक वाहनांमधून मुंबईला महामोर्चासाठी रवाना. घोटी टोल नाक्याजवळ जिल्हाभरातून आलेल्या कार्यक्रत्यासाठी नाश्ता.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे परभणीत होते. त्यांना राज ठाकरे यांच्या मोर्चा विषयी विचारले. परंतु मला यावर काहीही बोलायचं नाही, असे सांगून त्यांनी बोलणे टाळलं.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे परभणीत होते. त्यांना राज ठाकरे यांच्या मोर्चा विषयी विचारले. परंतु मला यावर काहीही बोलायचं नाही, असे सांगून त्यांनी बोलणे टाळलं.
मनसेच्या महामोर्चासाठी नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांकडून टोल आकारणी नाही, घोटी टोलनाक्यावर मनसेच्या वाहनांना टोल फ्री
मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात, मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला फरक पडत नाही, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांची टीका
नाशिक शहरातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना. निघण्यापूर्वी मखमलाबाद नाका परिसरातील हनुमान मंदिरात घेतले दर्शन. वाहनांना मनसेचे भगवे झेंडे आणि होर्डिंग्स. नाशिक जिल्ह्यातून 15 हजार मनसैनिक सहभागी होणार.
मनसेच्या मुंबईतील मोर्चासाठी पुण्यातील मनसे कार्यकर्ते निघण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी डेक्कन भागातील नदीपात्रात बसेसची सोय करण्यात आलीय. त्यापैकी काही बसेसवर भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचं नाव आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरू झाली आहे..

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक आणि राज्यभरातल्या इतरही प्रमुख शहरात मनसेने जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर लागले आहेत. रस्ते आणि उड्डाणपूल मनसेच्या झेंड्यांनी भगवे झाले आहेत.

मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्य़ेक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे. मनसेच्या मोर्च्यासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बँडही तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या मोर्च्यात मनसैनिकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसणार आहे. भगव्या रंगातल्या या टोपीवर राजमुद्रा आणि मनसेची निशाणी छापण्यात आली आहे.

सीएएला विरोध मात्र एनआरसीचं समर्थन, मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांकडून स्पष्ट

दरम्यान मोर्च्याच्या आधी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केलाय. प्रकाश महाजनांनीही मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरेंनी याआधीही रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण यावेळचा मोर्चा हा सुनियोजित आहे. पक्षाच्या बदलेल्या धोरणाची किनार या मोर्चाला आहे. त्यामुळं हा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.