MNS Morcha Against Siddivinayak Mandir Nyas : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Shree Siddhivinayak Temple) कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे (MNS) आक्रमक झाली. सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddivinayak Mandir Nyas) यांच्या कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आगर बाजार सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढला. मनसेने केलेल्या या आरोपांवर सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढील दोन दिवसात आपली भूमिका मांडणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केला आहे. 


सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून आर्थिक गैरव्यवहार : मनसेचा आरोप


सिद्धिविनायक मंदिर न्यास कडून अनागोंदी कारभार झाल्याचं मनसेने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. या सगळ्या अनागोंदी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी यासाठी मनसे आज आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर घोषणाबाजी करत पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली. 


मनसेचे आरोप काय? 


कोरोना काळात सिद्धिविनायक मंदिर अध्यक्ष आणि विश्वस्त यांनी मिळून हा आणागोंदी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेने कोणकोणते आरोप केले ते पाहूया...



  • - सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार सिद्धिविनायक मंदिर न्यासने केला.

  • - कोरोना काळात शिवभोजन थाळी त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच कोटी रुपये देण्यात आले, त्यात गैरव्यवहार झाला.

  • - 16  हजार लिटर तूप मागवण्यात आले आणि इतर मंदिरांना सुद्धा ते देण्यात आले, त्याचा वापर कसा करण्यात आला जर विक्री केली असेल तर त्याचा तपशील कुठे आहे?

  • - ॲडव्हान्स टॅक्स 1 कोटी 40 लाख 

  • - सांगली महापूर 100ट्रक पाणी 

  • - इमारत दुरुस्तीमध्ये ठेकेदाराला दंड नाही 

  • - क्युआर कोडमध्ये घोटाळ्याचा आरोप 

  • - सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकरांवर गंभीर आरोप  


सिद्धिविनायक मंदिर न्यास दोन दिवसात भूमिका मांडणार


यासंदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यास हे पुढील दोन दिवसात या सगळ्या आरोपांवर आपली भूमिका मांडणार आहे. शिवाय मनसेने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी सांगितलं.


VIDEO : MNS Protest Siddhivinayak Trust : सिद्धिविनायक मंदिरा बाहेर मनसेचं आंदोलन, ट्रस्टवर गैरव्यवहाराचा आरोप