मुंबई : मुंबईतील मनसेचे चेंबुरचे विभाग अध्यक्ष कर्णबाला दुनबळे यांच्यावर काल जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात डुंबले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कर्णबाला दुनबळेंच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत हा प्रकार घडला. दहा ते अकरा जणांच्या गटाने डुंबलेंवर लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. हा हल्ला शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास झाला.
हल्ल्यानंतर कर्णबाला दुनबळेंना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना 22 टाके पडले असून अंतर्गत इजाही झाल्याने डॉक्टर काळजीपूर्वक उपचार करत आहेत. सायन रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते.
चेंबुर पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
मनसेचे विभाग अध्यक्ष कर्णबाला दुनबळेंवर जीवघेणा हल्ला
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
04 Nov 2018 08:07 AM (IST)
दहा ते अकरा जणांच्या गटाने डुंबलेंवर लोखंडी रॉड, तलवारीने कर्णबाला दुनबळेंवर हल्ला केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -