मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आज मुंबईत या दोघांच्या 'कॉमन' मित्राच्या घरी दीर्घ चर्चा झाली. यामुळे मनसे महाआघाडीत येणार का? यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, अजित पवारांनी देखील मनसेबाबत सकारात्मक असल्याचे सुतोवाच केले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतर अजित पवार सांगितले की, मी राज ठाकरेंना भेटलो. संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे म्हणून आमची भेट झाली. मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसला कळवलं आहे. आम्हीही वरिष्ठांना कळवू, असे पवार म्हणाले. यावेळी जागांबाबत चर्चेचा प्रश्नच नव्हता. आधी दोन्ही पक्षांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत स्वीकारलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
दादरमध्ये राज ठाकरे-अजित पवार यांचे मित्र विवेक जाधव यांच्या निवासस्थानी दुपारी चारच्या सुमारास ही भेट झाली.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आघाडीबाबत चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. तर मंगळवारी अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेविरोधात मनसेने राष्ट्रवादी आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली.
अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर मनसेला महाआघाडीमध्ये सहभागी करण्यासंदर्भात राज ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ही बैठक उद्याच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाआघाडीत मनसे?, अजित पवार, राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2019 10:30 PM (IST)
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आघाडीबाबत चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. तर मंगळवारी अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेविरोधात मनसेने राष्ट्रवादी आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -