महिलेच्या विनयभंगाप्रकरणी मनसे नगरसेवक सुधीर जाधव अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2017 02:14 PM (IST)
मुंबई : मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक झाली आहे. महिलेला अश्लाघ्य व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली जाधव यांना दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दादरमध्ये पत्नीचा प्रचार करण्यासाठी सुधीर जाधव पीडित महिलेच्या घरी गेले होते. त्यानंतर दारुच्या नशेत व्हॉट्सअॅपवरुन जाधव यांनी रात्रभर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ कॉल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आपला पूर्ण फोटो पाठवण्याचा आग्रह जाधव यांनी केल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.