मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी पोस्ट
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2017 07:40 AM (IST)
दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचं दिसत आहे. मात्र दाऊदला मी खेचून आणल्याचं मोदी इतरांना सांगत आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे फेसबुक पेज लाँच केल्यानंतर चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. दुसऱ्याच पोस्टमध्ये राज यांनी व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. फेसबुक पेजच्या लाँचिंगवेळी मोदी आणि दाऊदबाबत केलेलं वक्तव्य राज ठाकरे यांनी कारटूनच्या माध्यमातून रेखाटलं आहे. या व्यंगचित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचं दिसत आहे. मात्र दाऊदला मी खेचून आणल्याचं मोदी इतरांना सांगत आहेत. एक 'तर्क'चित्र असं लिहित हे कारटून राज ठाकरेंनी शनिवारी रात्री 11.20 वाजता आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे.