डोंबिवली : मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठेंगा दाखवून शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर राज ठाकरेंना जाग आली आहे. इतर शहरांमधील मनसे कार्यकर्त्यांचं मनोबल कायम ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा डोंबिवलीचा दौरा हाती घेतला आहे.


राज ठाकरे डोंबिवली जिमखान्यात डोंबिवलीतील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी मनसेच्या 10 नगरसेवकांशीही बातचित करतील. त्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

मनसेची 6 नगरसेवकांचं सदस्यपद रद्द करण्यासाठी याचिका


कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेची वाताहत

केडीएमसीत मनसेचे दहा नगरसेवक

केडीएमसीचं विरोधीपक्ष नेतेपदही मनसेकडे

कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा मतदारसंघ - डोंबिवली शहर, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आमदार निवडून आले होते

कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर आणि कल्याण ग्रामीण - रमेश रतन पाटील

डोंबिवली शहर मतदारसंघात मनसे त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर होती

मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची सगळीकडे पिछेहाट

कल्याण डोंबिवलीत गतवैभव प्राप्त करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील

मुंबईतील सहा नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेच्या सभागृहात गैरहजेरी लावली. मनसेने पक्षाच्या परवानगीशिवाय मतदान करणाऱ्या नगरसेवकांना व्हिप जारी केला होता. त्यावर शक्कल म्हणून मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक अनुपस्थितीत राहिल्याची माहिती आहे.

सहाही नगरसेवक पुन्हा मनसेत जाण्याच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याची माहिती मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी दिली आहे. मुद्दामहून अशा अफवा पसरवल्या जात असल्या, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे

संबंधित बातम्या


व्हिपनंतरही मनसेच्या बंडखोर नगरसेवकांची सभागृहात अनुपस्थिती


कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे


शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?


सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 


मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 


शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?


करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप