राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी झायरा वसीम माझा कट्ट्यावर
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2017 11:15 PM (IST)
एबीपी माझाच्या कट्ट्यावर दंगल गर्ल झायरानं दंगलमध्ये तिच्या निवडीचे खास किस्से सांगितले.
मुंबई : देशाचं नंदनवन पण सध्या खदखदणाऱ्या काश्मीर खोऱ्यातल्या एका सामान्य घरातली मुलगी वयाच्या 15 व्या वर्षी तिला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली आणि दंगल सिनेमातून ती घराघरात पोहोचली. त्या मुलीचं नाव आहे झायरा वसीम. ‘दंगल’ सिनेमात पहेलवानाच्या भुमिकेत पाहिलेली झायरा तिच्या खऱ्या आयुष्यात अगदी कश्मीरची कली आहे. एबीपी माझाच्या कट्ट्यावर दंगल गर्ल झायरानं दंगलमध्ये तिच्या निवडीचे खास किस्से सांगितले. दंगलसाठी नेमकी निवड कशी झाली आणि तिथवरचा सगळा प्रवास तिनं यावेळी उलगडला. आपल्याला आजही अभिनय येत नाही. असंही तिनं यावेळी प्रांजळपणे कबूल केलं. मात्र, आमीर खाननं कशा पद्धतीनं आपल्याकडून अभिनय करुन घेतला हे देखील ती सांगयला विसरली नाही.