मुंबई: महापौरपदासाठी भाजप मराठीच चेहरा देणार असल्याची माहिती आता पुढे येत आहे. विशेष म्हणजे भाजपला मनसे आणि एमआयएमचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपनं आत्तापर्यंत 84 नगरसेवकांची गटनोंदणी केली असून संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.


आतापर्यंत सामोपचाराची भूमिका घेणारी भाजप आता मात्र, आक्रमक होणार असल्याचं दिसत आहे. आज मुंबईत महापौर पदाचा अर्ज भरायचा असल्यानं भाजपनं काल कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौरपदाच्या उमेदवारावरही चर्चा झाली असल्याची माहिती समजते आहे. मात्र, भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

या बैठकीत मुंबईतल्या सत्ता समीकरणावर तसेच सत्तेसाठी शिवसेनेची हातमिळवणी करायची का?,  शिवसेनेनं युतीचा पर्याय फेटाळल्यानंतर पक्षाची रणनिती काय असेल यावरही चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या:

शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची 'वर्षा'वर खलबतं

मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !

कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना

..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?

महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..

उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी

मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र...