LIVE : मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून आरोपी अमित कुरणेला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 01:37 AM (IST)
नांदेड : शेतकऱ्यावर 3 अस्वलांचा हल्ला, माहूर तालुक्यामधील गुंडवळ गावातील घटना, जखमी उत्तम जमदाडेंवर उपचार सुरु --------------------------------------- भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं व्हॉल्टमध्ये गाठली अंतिम फेरी, जिम्नॅस्टिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा कायम --------------------------------------- गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नको, हैदराबादमध्ये मोदींचा घणाघात, दलितांना त्रास देण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं विधान --------------------------------------- आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून परभणीतून आणखी एकाला अटक, नासिरबेन आणि शाहीद खानच्या चौकशीनंतर इकबाल शेखवर एटीएसची कारवाई --------------------------------------- गृहखात्यावर निगराणी ठेवण्यासाठी योग्य व्यक्तीची गरज, शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा, उस्मानाबाद बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी --------------------------------------- सांगलीत बलात्कार पीडितेची आरोपीच्या घरातच आत्महत्या, आरोपीवर कारवाई होत नसल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात संताप --------------------------------------- आमदारांच्या पगार वाढीला शरद पवारांचा पाठिंबा, मिळणारा पैसा अपुरा असल्याचं वक्तव्य, तर अमरावतीचे आमदार श्रीकांत देशपांडेंनी पगारवाढ नाकारली --------------------------------------- मुंबईला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात यावं, महापौर परिषदेत स्नेहल आंबेकरांची मागणी, तर शहराच्या विकासासाठी महापौरांना प्रशासकीय अधिकार देण्याचं आवाहन --------------------------------------- भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर पोहोचला, ठाकूर कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती --------------------------------------- कोयना धरणाचे दरवाजे 3 फुटांनी उचलले, 15 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात, नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा --------------------------------------- आज श्रावणातला पहिला सोमवार, पहाटेपासूनच शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी