मीरा रोड: मीरा रोड रेल्वे स्थानकावर एक गतीमंद व्यक्ती खांब्याच्या मदतीनं  रेल्वेच्या पेन्टाग्राफ वायरवर चढल्यानं 80 टक्के भाजल्याची घटना समोर आली आहे.


 

सोमवारी दुपारी घडलेल्या प्रकारानं मीरा रोड रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचा एकच थरकाप उडाला. दरम्यान, हा थरारक प्रकार काही प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. उच्चदाब असलेल्या वायरच्या संपर्कात आल्यानं तीव्र झटका लागून ही व्यक्ती खाली फेकली गेली. त्यानंतर बराच वेळ तो तसाच तडफडत होता.

 

अखेर रेल्वे पोलिसांनी त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती गतीमंद आहे. 80 टक्के भाजल्यानं या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे.

 

VIDEO: