ठाणे : एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात घडली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपीविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आई-वडील आणि मोठ्या बहिण-भावासह मानकोली परिसरात राहते. याच परिसरातील शाळेत ती शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे आई-वडील गोदामात सकाळच्या सुमारास कामावर गेले. शाळेतून आल्यानंतर पीडित मुलगी घरात एकटीच होती. हीच संधी साधून नराधमाने बलात्कार केला आणि आपलं बिंग फुटणार या भीतीने मुलीची टबमध्ये बुडवून हत्याही केली.
पीडितेचा लहान भाऊ घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला.
या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आता अज्ञात आरोपीविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
भिवंडीत 14 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2018 10:30 PM (IST)
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपीविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा नराधमाने घेतला.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -