मुंबईत शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी काश्मीरी जनतेसाठी विशेष प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रार्थनेसाठी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तर वारीस पठाण यांना ताब्यात घेतलेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. इतर काही लोकांना ताब्यात घेतलं असून आमदार पठाण यांना फक्त त्या जागेवरून दूर होण्यास सांगितलं अशी माहितीही पोलिसांनी दिली.
काश्मीरसंबधातलं 370 कलम हटविल्यानंतर काश्मीरात तणावपूर्ण शांतता आहे. तर देशभरात त्याचं स्वागत करण्यात आलं आहे. तर अनेक लोकांकडून या निर्णयाचा विरोध देखील केला जात आहे.