मुंबई : आजपासून मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला सुरवात झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वात मोठ्या पगाराची नोकरी ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिली आहे. मायक्रोसॉफ्टने वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट दिली आहे. मागील वर्षी सुद्धा सर्वात मोठी प्लेसमेंट मायक्रोसॉफ्ट कंपनीनेच दिली होती. मागील वर्षी मायक्रोसॉफ्टने 1 कोटी 14 लाख रुपयांचे पॅकेज दिले होते.
मायक्रोसॉफ्ट कंपनीखालोखाल ऑप्टिव्हर कंपनीने जवळपास वार्षिक 1 कोटी 2 लाख रुपयांचे तर उबर या कंपनीने जवळपास वार्षिक 1 कोटी 2 लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत.
दुसरीकडे देशांतर्गत कंपन्यासुद्धा या प्लेसमेंट सिजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक क्वालकॉम या कंपनीकडून वार्षिक 32.59 लाख रुपयांचे तर गुगलकडून वार्षिक 32 लाख रुपयांचे, गोल्डमन सॅक कंपनीकडून वार्षिक 31.50 लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
आज झालेल्या प्लेसमेंटमध्ये आयटी/सॉफ्टवेअर, कोअर इंजिनिअरिंग, फायनान्स अॅन्ड कन्सल्टिंग या क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवशी आयआयटीतील 110 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून प्लेसमेंट सिजनच्या पुढच्या स्लॉटमध्ये आणखी विदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेन्टल, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप यांसारख्या आणि काही नव्या कंपन्यांचा या प्लेसमेंट सेलमध्ये सहभाग असणार आहे.
आयआयटी मुंबईत प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्टकडून 1.17 कोटी पॅकेजची नोकरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2019 09:37 PM (IST)
आजपासून मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला सुरवात झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वात मोठ्या पगाराची नोकरी ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिली आहे. मायक्रोसॉफ्टने वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -