मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर 'म्हाडा'ने आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या जाहिरातीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या धनत्रयोदशीला म्हणजेच 5 नोव्हेंबरला घरांची सोडत निघणार आहे.


या दिवशी मुंबईतील एक हजार 194 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

घरांच्या किमती वाढल्यामुळे कोकण मंडळाच्या लॉटरीकडे अनेक जणांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही ठिकाणी ही महागडी घरं लॉटरी विजेत्यांनी परतही केल्याने म्हाडावर मोठी टीका झाली होती. यापासून बोध घेत म्हाडाने यंदा घरांच्या किमती कमी करुन मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांची दिवाळी भेट दिली आहे.

कोणत्या भागात किती घरं? उत्पन्न गट 

ठिकाण - अँटॉप हिल, वडाळा,
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 278
किंमत - 30,71,000

ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन,
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 83,
किंमत - 28,70, 700

ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन (RRकडून प्राप्त)
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 5
किंमत - 16,40,364

ठिकाण - पी.एम.जी.पी. मानखुर्द
उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट,
घरं - 114
किंमत - 27,26,757

ठिकाण - गव्हाणपाड, मुलुंड
उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट
घरं - 269
किंमत - 30,07,027

ठिकाण - सिद्धार्थनगर, गोरेगाव
उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट
घरं - 24
किंमत - 31, 85, 000

ठिकाण - पंतनगर, घाटकोपर
उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट
घरं - 2

ठिकाण - टागोरनगर, विक्रोळी
उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट
घरं - 7

ठिकाण - महावीरनगर
उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट
घरं - 170
किंमत 58,66,300

ठिकाण - पंतनगर OB-1, घाटकोपर
उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट
घरं - 2

ठिकाण - सहकारनगर
उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट
घरं - 8

ठिकाण - बदानी बोरी चाळ, परेल
घरं - 68

33 (7) अंतर्गत प्राप्त
घरं - 28