म्हडाने मुंबईतील 217 घरांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठीची सोडत 21 एप्रिल रोजी जाहीर होणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. आता घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांना 23 मे म्हणेजच निवडणूक निकालानंतरच दिलासा मिळणार आहे.
आचारसंहितेमुळे सोडतीवर निर्बंध
म्हाडाने निवडणुकीपूर्वी 217 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या 217 घरांसाठी बँकेत अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल असल्याचं नमूद केलं होतं. तसंच 21 एप्रिल रोजी वांद्र्यातील म्हाडाच्या मुख्यालयात ऑनलाईन पद्धतीने सोडत जाहीर होणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही त्वरित लागू झाली. त्यामुळे या कालावधीत म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर करण्यावर निर्बंध आले आहेत.
23 मे नंतरच सोडतीची तारीख जाहीर होणार
23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर म्हाडाच्या सोडतीचा मार्ग मोकळा होईल. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने म्हाडाच्या सोडतीची तारीख एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी पुढे गेली आहे. घरांची सोडत कधी जाहीर होईल हे 23 मे नंतरच जाहीर होईल, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अर्ज भरण्याची मुदत कायम
सोडतीची तारीख पुढे गेली असली तरी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचं कळतं. 13 एप्रिल हीच अर्ज सादर करण्याची मुदत आहे. यानंतर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांची संख्या आतापर्यंत सुमारे 10 हजारांवर पोहोचली आहे. ही संख्या येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व अर्जदारांना सोडतीसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हं आहेत.
217 घरं आणि 276 गाळ्यांची जाहिरात...
या सोडतीचं वैशिष्ट्य : यंदाच्या सोडतीत एकाच अनामत रकमेत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. याआधी प्रत्येक अर्जासोबत अनामत रक्कम द्यावी लागत असे.
घरांची सोडत
मध्य उपन्न गट (MIG )
पवई - 46 घरं
सहकार नगर चेंबूर 23 - 01 घरं
अल्प उत्पन्न गट (LIG)
सहकार नगर चेंबूर 2 - 64 घरं
सहकार नगर चेंबूर 23 - 41 घरं
सहकार नगर चेंबूर 23 - 13 घरं
सहकार नगर चेंबूर 37- 52घरं
ई-लिलाव माध्यमांतून गाळ्यांची सोडत
प्रतिक्षानगर, सायन - 35
न्यू हिंद मिल, माझगाव - 04
विनोबा भावेनगर, कुर्ला - 14
स्वदेशी मिल, कुर्ला - 05
तुर्भे मंडाले मानखुर्द - 07
तुंगा पवई -05
गव्हाणपाडा मुलुंड - 11
मजासवाडी जोगेश्वरी - 01
शास्त्रीनगर गोरेगाव - 04
सिद्धार्थनगर गोरेगाव - 01
चारकोप भूखंड क्र 1 - 20
चारकोप भूखंड क्र 2 - 19
चारकोप भूखंड क्र 3 - 4
मालवणी मालाड- 69
विरार बोलीज - 57
वेंगुर्ले सिंधुदुर्ग - 20