Metro 3 & Aarey Metro Car Shed : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची (Metro 3) आज ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ची ट्रायल होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला (Aarey Metro Car Shed) पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना दुसरीकडे आज मेट्रो 3 ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रेक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता ही आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.


आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवर होणार चाचणी


आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना दुसरीकडे मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता ही आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत  निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-3 चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो - 3 ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती आहे.


आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणी


सर्वोच्च न्यायालयात आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणी होणार असून राज्य सरकारला आज कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. 24 ऑगस्टच्या सुनावणीत राज्य सरकारनं आणखी कागदपत्रं जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. तेव्हा न्यायालयाने अशात आणखी किती दिवस आम्ही सुनावणी पुढे ढकलायची?, असा प्रश्न उपस्थित केला होता. आज पूर्वीच्या सातही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय राज्य सरकारनं सुरु केलेल्या ट्रायल रनला हिरवा कंदील कायम ठेवतं की लालफितीत अडकवतं हे बघणं महत्त्वाचे असेल. 


मेट्रो कारशेडचे काम सुरू?


आरे परिसरातील मुख्य मार्गांवरील काही झाडे छाटणी करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी गोरेगाव चेक नाका ते पवईला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला. मेट्रोचे कोच आणण्यासाठी झाडांची छाटणी सुरू असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता.  मात्र आरे कन्झर्वेशन ग्रुपने आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये आरेतील मेट्रो कारशेडच्या ठिकाणी असलेली झाडे जेसीबीच्या मदतीने पाडण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता.   आरेमधील मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे, त्याठिकाणी अद्याप वृक्षतोड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी असलेली झाडे अद्यापही कापण्यात आली नाहीत अथवा कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही. मात्र, मेट्रोच्या बोगीज् आणणार आहेत, त्यामुळे लवकरच कारशेडचे काम सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


काय आहे मेट्रो कारशेडचा वाद?


मुंबई महापालिका जी गेली 30 वर्षे शिवसेनेच्याच ताब्यात आहे, त्याच महापालिकेतल्या वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली. इतकेच नव्हे तर याबाबत परवानगीचे पत्रही महापालिकेने मेट्रो प्राधिकरणाला दिलं. वृक्ष प्राधिकरण समितीत ही मंजुरी दिली जात असताना बराच गोंधळ झाला, या गोंधळातच ही मंजूरी दिली गेली. त्यानंतर एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी 'आरे'कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन सुरु झालं. ठाकरे सरकार आल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. त्यानंतर कांजूरमार्ग इथं कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मेट्रो कारशेडचा वाद न्यायालयात पोहोचला होता. पण महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार येताच आरेमध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला.