मुंबईः मेट्रो-3 प्रकल्पाच्या कामाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गासाठीच्या या प्रकल्पासाठी 83 टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.


 

या प्रकल्पाच्या बांधकामाचं कंत्राट एल अँड टी, एचएससी यासारख्या पाच नामांकित कंपन्यांना मिळालं आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2020 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. 2020 साली सीप्झ ते वांद्रे दरम्यान मेट्रो धावणं अपेक्षित आहे. 33.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी सुमारे 18 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

 

कोणत्या कंपनीकडे कोणतं स्थानक?

  • कंपनीः एल अँड टी


स्थानकः कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक

प्रकल्पाची किंमतः 2988.53 कोटी रुपये

 

  • कंपनीः एल अँड टी


स्थानकः मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ

प्रकल्पाची किंमतः 2281.45

 

  • कंपनीः जे. कुमार


स्थानकः धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुझ

प्रकल्पाची किंमतः 2817 कोटी

 

  • कंपनीः जे. कुमार


स्थानकः छत्रपती शिवाजी एअरपोर्ट, सहार रोड

प्रकल्पाची किंमतः 2118.40 कोटी

 

  • कंपनीः एचसीसी


स्थानकः सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड

प्रकल्पाची किंमतः 2521.89 कोटी

 

  • कंपनीः सीएसी-आयटीडीसीएम-टीपीएफएल


स्थानकः सिद्धिविनायक, दादर मेट्रो, शितलादेवी

प्रकल्पाची किंमतः 2830.10 कोटी

 

  • कंपनीः डोगस सोमा


स्थानकः महालक्ष्मी मेट्रो, मुंबई सेंट्रल, सायन म्युझियम, आचार्य अत्रे आणि वरळी

प्रकल्पाची किंमतः 2830.10 कोटी