मुंबई: ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता 'मेरु'नं आपल्या भाडे दरात कपात केली आहे.


 

मेरुनं आपल्या भाडेदरात पहिल्या टप्प्यासाठी जवळजवळ 6 रुपयांची कपात केली आहे. तर प्रत्येक किलोमीटर प्रवासाच्या भाड्यात 4 रुपयानं कपात केल आहे. राज्य सरकरानं टॅक्सीसाठी किमान भाडं 22 रुपये निश्चित केलं आहे. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेरुनं आता आपल्या दरामध्ये भरघोस कपात केली आहे.

 

पहिल्यांदाच टॅक्सी कंपन्यांनी अशा प्रकारची दरामध्ये कपात केली आहे. मेरु तब्बल 20 टक्क्यांची सूट दिली आहे. इतर टॅक्सी कंपन्यांच्या तुलनेत मेरुच्या सेवा फार उत्कृष्ट नसल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.

 

मेरुचे सीईओ सिद्धार्थ पहवा यांनी सांगितलं की, 'मुंबईमधील ग्राहकांना स्वस्त दरात टॅक्सी सेवा मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही 20 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र, या कपातीचा आमच्या टॅक्सी सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.

 
मेरुप्रमाणेच टॅबनंही ग्राहकांना टॅक्सी भाड्यात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण टॅक्सी प्रवास भाड्यावर टॅब कॅब 18% सूट देणार आहे. तर टॅब कॅब गोल्डच्या एकूण प्रवास भाड्यावर 28% सूट देणार आहे.

 

मेरु: पहिल्या टप्प्यासाठी सध्याचे प्रवासभाडे 27 रु. तर त्यापुढील प्रवासासाठी 20 रुपये प्रतिकिमी भाडे आकारलं जातं.
 

 

कपातीनंतर मेरुचे दर: पहिल्या टप्प्यासाठी नवं प्रवासभाडे 21.5 रु. तर त्यापुढील प्रवासासाठी 16 रुपये प्रतिकिमी भाडे आकारलं जाणार.