कल्याण: कल्याणच्या आधारवाडी चौकातील एका घरात सिलेंडर लिक झाल्याने स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या घटनेत ताराबाई गायकवाड नावाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 9 जण जखमी झाले आहेत.   घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.   सिलेंडर लिक झाल्याचं लक्षात न आल्यानं हा स्फोट झाला. ज्यामध्ये महिलेला आपला जीव गमवावा लागला.