मुंबई : मुंबईतल्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट, हार्बरवर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट वाहतूक सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी साडेचारपर्यंत स्लो मार्गावरून चालवण्यात येईल. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत...
तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान कुर्ला ते वाशी रेल्वे वाहतूक बंद असणार आहे.
पश्चिम मार्गावर आज बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बोरिवली ते अंधेरीदरम्यानची अप आणि डाऊन स्लो लोकलची वाहतूक अप आणि डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे.