मुंबई : रेल्वेरुळांची देखभाल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसह अन्य कामांसाठी मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.

मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड स्लो मार्गावर आज सकाळी 11.20 ते दुपारी 03.50 वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.57 वाजल्यापासून डाऊन स्लो मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकानंतर डान फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या सर्व लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवरच थांबतील. त्यामुळे विद्याविहार कांजुरमार्ग नाहूर स्थानकांवरील प्रवाशांना मेगाब्लॉकच्या काळात अप स्लो मार्गावर घाटकोपर भांडुप आणि मुलुंड स्थानकांपर्यंत प्रवास करण्याची मुभा असेल.

पश्चिम रेल्वेवर 26 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे आज दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. तसंच ट्रान्स हार्बरवरही कोणताही मेगाब्लॉक आज घेतला जाणार नाही.

मेगाब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेवरील काही लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकमुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहे.