ठाणे : मध्य रेल्वेमार्गावर ठाणे-डोंबिवली दरम्यान पारसिक बोगद्याजवळ दरड कोसळली. मात्र दरड हटवण्यासाठी दुपारी साडेतीनपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परंतु हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने मेगाब्लॉकचे तास वाढण्यात आले आहेत.
पारसिक बोगद्याजवळ दरड कोसळल्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर झाला आहे. या बोगद्यातून फास्ट ट्रॅक जातो. त्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. याशिवाय ठाण्यापासून कर्जतपर्यंत सर्व गाड्या धिम्या मार्गावर वळवल्या आहेत.
दरम्यान दरड कोसळण्याच्या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.