मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची दुरुस्ती आणि विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील वाहतूक उशिरानं धावणार आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो मार्गांवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. तर हार्बर रेल्वे मार्गांवर नेरुळ ते पनवेल अप आणि डाऊन स्लो मार्गांवर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरही अंधेरी ते बोरीवली डाऊन आणि अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो लाईनवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सकाळी 10.48 ते दुपारी 4.23 मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व डाऊन स्लो वरील लोकल कल्याणपर्यंत फास्ट ट्रॅकवरुन चालवण्यात येतील. या लोकल फक्त ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्टेशनवर थांबतील. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं धावेल.
डाऊन स्लो मार्गांवरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना अप दिशेनं दिवा, डोंबिवली आणि कल्याणवरुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान सकाळी 10.20 ते दुपारी 2.42 या वेळातील सीएसएमटीवरुन सुटणाऱ्या डाऊन फास्ट मार्गावरील सर्व लोकल्स घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि 15 मिनिटे उशिराने धावतील. अप फास्ट मार्गावरील सकाळी 11.00 ते दुपारी 03.08 वाजेपर्यंत कल्याणवरुन सुटणाऱ्या सर्व लोकल्स दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं धावेल.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावर नेरुळ ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत पनवेल आणि बेलापूरवरुन सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या सर्व लोकल आणि नेरुल ते पनवेल आणि बेलापूरसाठी सुटणाऱ्या सर्व डाऊन हार्बर लोकल आज रद्द असतील.
सकाळी 11.04 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत पनवेल आणि बेलापूरवरुन ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल आणि सकाळी 11.42 ते दुपारी 04.04 वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेल आणि बेलापूरसाठी सुटणाऱ्या सर्व ट्रान्सहार्बर लोकल रद्द असतील.
ब्लॉकच्या काळात पनवेल ते अंधेरी सेवा लोकलबंद असेल. तसंच सीएसएमटी-नेरुळ आणि ठाणे नेरुळ मार्गांवर विशेष लोकल चावलण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवरही आज अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ब्लॉकच्या काळात सर्व अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील लोकल अंधेरी ते बोरीवली दरम्यान स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावेल.
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2017 08:02 AM (IST)
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची दुरुस्ती आणि विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील वाहतूक उशिरानं धावणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -