नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. महापालिकेत तब्बल 4713 इतकी पदं भरण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली.   कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.   याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच ही पदं भरली जातील, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.   तुकाराम मुंढे यांचा लोकाभिमुख प्रशासन करण्यावर अधिक भर आहे. यासाठी ते विभाग कार्यालय आणि झोनल कार्यालयाची कार्यक्षमता वाढवत आहेत. जेणेकरून ८० टक्के कामं या कार्यालयांच्या माध्यमातून केली जातील आणि नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न या ठिकाणीच सुटतील.   शासनाची मंजुरी मिळताच कायमस्वरूपी ही पदं भरली जातील, अशी माहिती मुंढे यांनी दिली. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये पालिका स्थापन झाल्यापासून प्रॉपर्टी सर्व्हे झाला नसल्याने हा सर्व्हेही करण्यात येणार आहे.