मुंबई : घाटकोपर स्थानकात शनिवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटे ते रविवारी पहाटे 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान घाटकोपर स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. मेगाब्लाकमुळे दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे
रविवारी मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे मार्गावर अप-धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.48 वाजल्यापासून 4.14 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मेगाब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर लोकल सेवा बंद असणार आहे.


हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप-डाउन मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येतील.