प्रीती कृष्णन 2004 -2006 या काळात 'टीस' संस्थेत मास्टर ऑफ आर्टस् चा शिक्षण घेत असताना पी.विजयकुमार यांनी प्रबंध तयार करतेवेळी मार्गदर्शक म्हणून प्रीती कृष्णन सोबत काम केलं होतं.
या काळात त्यांनी मला एकेदिवशी स्वतःच्या घरी नेऊन चुंबन घेण्याची जबरदस्ती केली शिवाय या काळात त्यांनी अनेकदा माझ्या सोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप प्रीतीने लिहलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे. मात्र, त्यावेळी आपण घाबरलो होतो, शिवाय दबाव असल्याने हे प्रकरण मी त्यावेळी समोर आणलं नसल्याचा मला खेद आहे, असं देखील प्रीतीने फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.
'मी टू' मोहिमेमुळे मला एक धाडस मिळालं आणि त्यामुळे मी हा प्रकार लिहिल्याचं प्रीतीने सांगितलं आहे. शिवाय हा प्रकार इतर मुलीसोबत होऊ नये आणि झाल्यास त्यांनी हा प्रकार न घाबरता समोर आणावा, असंही तिने सांगितलं आहे. याबाबत 'टीस'चे प्राध्यापक पी.विजयकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसून 'टीस' व्यवस्थापन याबाबत चौकशी करत असल्याचे संस्थेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.