कडोंमपाचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द
एबीपी माझा वेब टीम | 30 Nov 2017 06:11 PM (IST)
निवडणूक अर्जासोबत राजेंद्र देवळेकर यांनी दोन जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. कारण की, कडोंमपाचे शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवळेकर यांच्यासह शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. निवडणूक अर्जासोबत राजेंद्र देवळेकर यांनी दोन जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली आहे.