मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देत आहे. मात्र, तरीही रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी होतना दिसत नाही. परिणामी प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, भाजीमंडईतील गर्दी अद्यापही कमी होताना दिसत नाही. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी पाहून कोरोनाविरूद्धच्या लढाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. जर गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने भाजीमंडाई बंद करावी लागेल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
कोरोना संकटाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूर महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले. धारावी सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाने शिरकाव केल्याने महापालिका प्रशासन सावध झाले आहे. रतन टाटा हे आज देवताचे रूप आहे. टाटा यांनी त्यांच्या मालकीची मुंबईतील बरीच हॉटेल्स आणि महाविद्यालये क्वॉरंटाईनसाठी दिली आहे. गरज पडल्यास शाहरुख खानचे कार्यालय देखील क्वॉरंटाईनसाठी वापरले जाईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. विशेष म्हणजे अभिनेता शाहरुख खान यानेच राज्य सरकार आणि प्रशासनाला आपले जुने कार्यालय क्वॉरंटाईनसाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.
मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस : अजित पवार
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांना दहन रणेकच योग्य
मुंबई महापालिकेने कोरोनाने मृत्यू झालेल्या मृताचे मृतदेह जाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मुस्लीम नेत्यांच्या दबावानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. यावर मुस्लीम नेत्यांनी अशा संकटकाळात मतांचे राजकारण न करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. बीएसीच्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
Covid-19 Test Labs | राज्यातील शासनमान्य कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची यादी
राज्यातील आकडा वाढतोय
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला राज्यात 864 रुग्णसंख्या आहे. यात मुंबईत सर्वाधिक 500 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर, आतापर्यंत 56 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात सात रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत राज्यात 45 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची वेगाने कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना रॅपीड टेस्ट घेण्याचेही सरकारकडून प्रयत्न आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तबलिगी समाजाच्या धर्मगुरुंसोबत बैठक, सामाजिक एकोपा राखण्याबाबत चर्चा