मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीचा आज पहिला महत्वाचा टप्पा आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवारीसाठी आज सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. मुंबई महापालिकेच्या चिटणीसांकडे हे अर्ज सादर केले जातील.


भाजप, शिवसेनेकडून अद्याप उमेदवारीसाठी नाव निश्चित न झाल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शर्यतीत असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरण्याची पूर्वतयारी केली आहे. फक्त पक्षाचा आदेश येण्याचा अवकाश.

कशी असेल महापौर निवडणुकीची प्रक्रिया-

- महापौर, उपमहापौर पदासाठी ११ ते ६ या वेळेत अर्ज भरले जातील.

- अर्जांच्या छाननीचे काम चिटणीस विभागाकडून केले जाईल.

- प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी १२ वाजता हे सर्व अर्ज सभागृहापुढे सादर होतील.

- सर्व नविन नगरसेवकांच्या उपस्थितीत पालिका सभागृहामध्ये पिठासीन अधिकारी म्हणजेच महापौर स्नेहल आंबेकर या महापौर पदासाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांची नावे वाचून दाखवतील.

- त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५-२० मिनिटे वेळ दिला जाईल. मग महापौर पदाच्या शर्यतीतील उमेदवारांची क्रमानुसार नावे पुकारली जातील.

- नाव पुकारल्यानंतर त्याला मत देण्यासाठी समर्थक नगरसेवकांना हात वर करावे लागतील.

- त्याच बरोबर प्रत्येक समर्थक नगरसेवकाला कुणाला पाठिंबा आहे, हे विचारून त्याला उमेदवाराच्या नावापुढे सही करावी लागेल. जर चुकून किंवा जाणूबुजून एखाद्या नगरसेवकांने हात एकासाठी वर केला आणि सही मात्र दुसऱ्याच उमेदवारापुढं केली,  तर ते मत बाद ठरवले जाईल.

- या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग केलं जाईल. अशा प्रकारे सर्व उमेदवारांची नावे पुकारून त्याला असलेल्या समर्थक नगरसेवकांची संख्या मोजली जाईल.

- इथं विधानसभेप्रमाणे सत्तेसाठी मॅजिक फिगर गाठण्याची गरज नसल्यानं सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार महापौर म्हणून घोषित केला जाईल. यानंतर सध्याचे महापौर नव्या महापौरांच्या हाती सुत्रे सोपवतील.

संबंधित बातम्या:

शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं

मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !

कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना

..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?

महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..

उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी

मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…