'डी' कंपनीला आणखी एक धक्का, मटका किंग पंकज गांगरला अटक
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2017 11:50 PM (IST)
मुंबईतला मटका किंग म्हणून ओळखला जाणारा पंकज गांगर डी कंपनीच्या अगदी जवळचा मोहरा मानला जातो.
मुंबई : खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इक्बाल कासरकरचा साथीदार पंकज गांगरला अटक करण्यात आली आहे. मुंबईतला मटका किंग म्हणून ओळखला जाणारा पंकज गांगर डी कंपनीच्या अगदी जवळचा मोहरा मानला जातो. पंकज गांगरचे संबंध थेट पाकिस्तानात लपून बसलेल्या छोटा शकील आणि अनिस इब्राहिमशी असल्याची माहिती मिळते आहे. इक्बाल कासरकरच्या चौकशीदरम्यान ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाला पंकज गांगरबद्दल माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गांगरच्या मुसक्या आवळल्या. इक्बाल कासरकरच्या चौकशीनंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण चार जणांना अटक केली आहे.