माथेरान: माथेरानची फुलराणी अर्थात 'टॉय ट्रेन' एअरब्रेक सिस्टिमसह पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेन प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. यावर्षी मे महिन्यात सुरक्षेच्या कारणावरुन टॉय ट्रेन बंद करण्यात आली होती.


6 कोच आणि 3 इंजिन असलेली टॉय ट्रेन म्यॅनुअल बेक्रच्या साहाय्यानं चालवणं धोकादायक असल्याचा निष्कर्ष सेंट्रल रेल्वेनं नेमलेल्या सुरक्षा समितीनं काढला. त्यानंतर आता एअर ब्रेक सिस्टीमसह ट्रेनची सुरक्षा चाचणी घेतल्यानंतर टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

दरम्यान, यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच ट्रेन दोनदा रुळावरुन घसरली होती. त्यामुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती. याचा माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ही फुलराणी पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे.