बाजार समित्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2016 01:37 AM (IST)
मुंबई : राज्यातील बाजार समित्यांचा संपाचा आज चौथा दिवस आहे. फळ आणि भाजीपाला बाजार समित्यांमधून नियंत्रणमुक्त केल्याच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत. नवी मुंबई बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनीही आजपासून संपाची हाक दिली आहे. नवी मुंबई बाजार समिती ही राज्यातली सर्वात मोठ्या समित्यांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या संपाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे. सरकार आणि व्यापाऱ्यांमधील बैठकही निष्पळ ठरली आहे. त्यामुळे बाजार समित्यांचा प्रश्न आणखी चिघळताना दिसतो आहे. भाजपीला नियंत्रणमुक्तीविरोधात राज्यभरातील बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. आज बंदचा चौथा दिवस आहे. दरम्यान, पुणे आणि नाशिकमध्ये व्यापाऱ्यांच्या आठमुठेपणाला शेतकऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.