मुंबई : तुम्ही मुंबईतल्या महामार्गांवरुन प्रवास करत असाल, तर थोडं सावधान. कारण मुंबई शहर आणि परिसरातल्या अनेक महामार्गांवर गाड्या अडवणाऱ्या दरोडेखोरांची टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळत आहे. याचा अनुभव अभिनेता आशुतोष कुलकर्णीला आला असून, त्यानं फेसबुकद्वारे तो जगासमोर मांडलाय.


ही टोळी महामार्गावरील गाड्यांना हातवारे करुन गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करते. ह्या टोळीतले दरोडेखोर गाडीच्या पुढच्या बाजूला काही प्रॉब्लेम असल्याचं दोन-तीनदा हातवारे करत सांगतात. आणि हे पाहून चालक गाडी थांबवतो आणि ही टोळी गाडीतल्या लोकांना लुबाडते.

आशुतोष कुलकर्णीला असा अनुभव अलीकडेच जेव्हीएलआर मार्गावर आल्याचंही त्यानं व्हिडिओत सांगितलं आहे.